12 जानेवारीपासून पुन्हा उघडणार देशातील अॅपल कंपनीचा प्लांट


नवी दिल्ली – 12 जानेवारी रोजी अ‍ॅपलची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन आपला भारतामधील उत्पादन प्लांट पुन्हा उघडणार आहे. दक्षिण भारतात आपली बंद केलेली आयफोन उत्पादन सुविधा फॉक्सकॉन पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली रॉयटर्सला आहे. 18 डिसेंबर रोजी तामिळनाडूत असलेला फॉक्सकॉन प्लांट बंद करण्यात आला होता. अन्नातून प्लांटमधील 250 हून अधिक कामगारांना विषबाधा झाल्यामुळे या घटनेच्या निषेधानंतर हा प्लांट बंद करण्यात आला होता.

तामिळनाडूमधील अ‍ॅपलची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉन यांच्या आयफोन उत्पादन प्लांटमध्ये सुमारे 250 कामगारांना विषबाधा झाली. यावेळी काही वसतिगृहे आणि जेवणाचे खोली आवश्यक नियमावली पालन करत नसल्याचे आढळून आले. त्यानंतर अ‍ॅपलने हा कारखाना देखरेखीखाली बंद ठेवला होता. त्यानंतर आता तो पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

आपल्या फ्लॅगशिप आयफोन 13 चे चाचणी उत्पादन अ‍ॅपलने फॉक्सकॉन प्लांटमध्ये सुरू केले होते. कारण यूएस टेक्नॉलॉजीची प्रमुख कंपनी देशातील जवळपास सर्व टॉप-सेलिंग स्मार्टफोन मॉडेल्स तयार करण्यासाठी सज्ज आहे. भारतात आयफोन 13 चे व्यावसायिक उत्पादन फेब्रुवारीपर्यंत देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात दोन्हीसाठी सुरू करण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

अ‍ॅपलने याआधीच सेमीकंडक्टर चिप्सचा पुरवठा सुरक्षित केला आहे. ज्यामुळे भारतामध्ये उत्पादनाच्या विस्ताराची योजना आखण्यात मदत झाली आहे. भारतात आयफोन 13 चे उत्पादन अ‍ॅपलला त्याच्या जागतिक बाजारपेठेत मॉडेलचा पुरवठा सुधारण्यास मदत करेल कारण भारतात जे उत्पादित केले जाते त्यापैकी 20-30% सामान्यतः निर्यात केले जातात, असे कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.