अमेरिकेत देखील आहेत भारतीय नावांची शहरे

आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की, दिल्ली, बॉम्बे, अल्मोडा, शिमला अशी नाव असणारी शहर केवळ भारतातच आहेत. मात्र असे नाहीये. या नावाची शहर अमेरिकेत देखील आहेत. भारतामधील अमेरिकी एंबेसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून #USIndiaDosti वापरत  ही माहिती शेअर केली.

युएस इंडिया एंबेसीने ट्विट केले की, तुम्हाला माहिती आहे का की अमेरिकेतील 9 शहरांची नावे ही भारतीय शहरांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. तुमच्या पुढील अमेरिका प्रवासादरम्यान दिल्ली, न्यूयॉर्क अथवा लखनऊ, पेंसिल्वेनिया अथवा कोलकाता, ओहिया याठिकाणी नक्की जा.

काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेत हाउडी मोदी हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी 50 हजारांपेक्षा अधिक भारतीय समूदायाला संबोधित केले.

Leave a Comment