140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली

अमेरिकेच्या मिशिगन येथील उत्तरी समुद्रात 140 वर्षांपुर्वी गायब झालेली दोन जहाज सापडली आहेत. मागील 10 वर्षांपासून या जहाजांचा शोध सुरू होता. याबाबतची माहिती डाइव्हर्स आणि समुद्र इतिहासकार बर्नी हेलस्ट्रॉम यांनी दिली. त्यांनी सांगितले की, दोन्ही जहाज समुद्रात जवळपास 200 फूट खाली होती. जहाज पुर्णपणे खराब झालेली आहेत, त्यांचा केवळ ढाचा राहिला आहे.

बर्नी हेलस्ट्रॉम यांनी सांगितले की, ही जहाज 1878 मध्ये गायब झाली होती. त्यांची नाव पेशेटिगो आणि सेंट एंड्र्युज आहेत. ज्यावेळी ही दोन्ही जहाज गायब झाली त्यावेळी त्यावर कॅप्टन सोबत आणखी दोन क्रू मेंबर्स देखील होते. अमेरिकेचे समुद्र इतिहासकार हा मोठा शोध असल्याचे सांगत आहेत.

(Source)

त्यांनी सांगितले की, पेशेटिगो 161 फूट लांब आणि सेंट एंड्र्यूज 143 फूट लांब होता. त्यांचा वापर कोळसा घेऊन जाण्यासाठी केला जात असे. सांगण्यात येते की, एखाद्या खडकाला धडकून दोन्ही जहाज बुडाली असावीत.

Leave a Comment