पृथ्वीवरील स्वर्ग पाहायचे असेल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या


स्वर्गात जाण्याची इच्छा कोणाची नसते. मात्र पृथ्वीवर राहून स्वर्ग बघणे शक्य नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणं सांगणार आहोत, जी स्वर्गापेक्षा अजिबात कमी नाहीत. या ठिकाणी जाऊन तुम्हाला नक्कीच स्वर्गात आल्याप्रमाणे अनुभव येईल. जाणून घेऊया या सुंदर ठिकाणांबद्दल.

(Source)

अमेरिकेच्या मिसौरी प्रांतातील या गुफेचा 1880 मध्ये शोध लागला होता. या गुफेचे नाव ‘ओजार्क्स कवेर्न्स’ आहे. ही गुफा ‘एंजेल शॉवर्स’ या प्रसिध्द कारंज्यासाठी प्रसिध्द आहे. या गुफेच्या छतामधून येणाऱ्या पाण्याच्या धारा बाथटबच्या आकाराप्रमाणे पडताना दिसतात. हे सुंदर दृष्यपाहून स्वर्गात आल्याचाच अनुभव येतो.

(Source)

रंगीबेरंगी रोषणाईने सजलेली लाइमस्टोनची ही गुफा जवळपास 180 मिलियन वर्ष जुनी आहे. चीनमधील या गुफेला द्वितीय विश्व युध्दादरम्यान जापानी सैनिकांनी शोधले होते. या गुफेला रीड फ्लूट नावाने ओळखले जाते. सांगितले जाते की, जगात जर कोठे स्वर्ग असेल तर तो या जागेप्रमाणेच असेल.

(Source)

फिलिपिन्सच्या पलावन द्वीपवरील ‘प्युर्टो प्रिसेंस’ ही भूमिगत नदी आहे. ही जगातील सर्वात मोठी भूमिगत नदी असून, 2012 मध्ये या नदीचा जगातील सात नवीन आश्चर्यामध्ये समावेश करण्यात आला होता.

(Source)

रोमानियाच्या ट्रांसिल्वानिया जवळील मीठाची खाण 1992 पासून पर्यटकांसाठी उघडण्यात आली आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. या जागेला ‘सलीना तुरडा’ नावाने ओळखले जाते.

(Source)

ग्लोवॉर्म नावाने ओळखली जाणारी ही फंगस (बुरशी) केवळ न्युझीलंडमध्येच आढळते. ग्लोवॉर्ममुळे या गुफेत नेहमी उजेड पसरलेला असतो. या ठिकाणाचे नाव वाइटोमो ‘ग्लोवॉर्म गुफा’ आहे.

Leave a Comment