यामुळे 209 वर्ष जुन्या कब्रस्तानातून काढण्यात येत आहेत मृतदेहांचे सांगाडे

जग हे खरचं विचित्र आहे असे म्हटले जाते. येथे रोज काहींना काही नवीन घडत असते. अशीच काहीशी घटना ब्रिटनमधली आहे. ब्रिटनमधील दोन शतकांपेक्षा जुनी दफनभूमी खोदून त्यातील मृतदेहांचे हाडांचे सांगाडे काढण्यात येत आहेत. या दफनभूमीतून काढण्यात येणाऱ्या सांगाड्यांचे कारण समजल्यावर तुम्ही देखील हैराण व्हाल.

(Source)

ब्रिटनच्या बर्मिंघम येथील दफनभूमी खोदून एचएसटू रेल्वे स्टेशन बनवले जाणार आहे. या दफनभूमीतील तब्बल 6,500 मृतदेह काढले जाणार आहेत. अधिकाऱ्यांनुसार, बर्मिंघममध्ये रेल्वे योजने अंतर्गत स्ट्रीट रेल्वे स्टेशनचे निर्माण केले जाणार आहे. याच कारणामुळे या दफनभूमीचे खोदकाम केले जात आहे. अत्याधुनिक मशीनद्वारे हे सांगाडे काढण्यात येत आहेत.

(Source)

209 वर्ष जुन्या या दफनभूमीत मागील 46 वर्षांपासून एकही मृतदेह दफन करण्यात आलेला नाही. रेल्वे स्टेशनची घोषणा झाल्यानंतर पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमने येथे येऊन खोदकाम केले असता त्यांना मुर्त्या, नाणे, खेळणी, किंमती हार अशा अनेक गोष्टी सापडल्या. बर्मिंघमच्या स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे की, एका चर्चशी चर्चा केल्यानंतर हे सर्व मृतदेह दुसऱ्या ठिकाणी दफन केले जातील.

Leave a Comment