ऑनलाईन ट्रॅफिक चलान भरण्यासाठी काही टीप्स


ट्रॅफिकच्या नियमांमध्ये बदल होऊन 1 महिना होत आलेला आहे. अनेक राज्यांमध्ये दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे, तर अनेक राज्यांनी सद्यस्थितीमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यास नकार दिला आहे. दंडाच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये भिती आहे.

आज आम्ही तुम्हाला तुमच्या गाडीवरील चलानचे स्टेट्स कसे तपासता येईल व ऑनलाइन चलान कसे भराल हे सांगणार आहोत. वेगवेगळ्या शहरात आणि राज्यांमध्ये ऑनलाइन चलान भरण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाइट्स आहेत.

(Source)

ट्रॅफिक चलान ऑनलाइन असे भरा –   

  • रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाची वेबसाइट गुगल क्रोमवर योग्यरित्या कार्य करत नाही. अशावेळेस तुम्हाला ही वेबसाइट क्रोमवर वापरताना अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या ब्राउजरवर ही वेबसाइट उघडू शकता.
  • ई-चलान वेबसाइट उघडल्यावर Check Challan Status वर जावे.
  • चलान स्टेट्स चेक करण्यासाठी चलान नंबर, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसेंस असे तीन पर्याय असतील.
  • जर तुमच्या गाडीवर चलान कापलेले असेल, तर ती रक्कम तेथे दिसेल.
  • त्यानंतर रक्कम भरण्यासाठी Pay Now वर क्लिक केल्यावर तुमच्या राज्याची वेबसाइट उघडेल.
  • ई-चलानची रक्कम भरण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता.

(Source)

पेटीएमद्वारे भरा ई-चलान – 

  • ट्रॅफिक चलानची रक्कम ऑनलाइन भरण्यासाठी पेटीएमचा देखील वापर करता येईल. पेटीएम अॅप आणि वेबसाइट आंध्र प्रदेश, चेन्नई, फरीदाबाद, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये सपोर्ट करते.
  • या शहर आणि राज्यांमध्ये ट्रॅफिक चलान भरण्यासाठी पेटीएमवरील ई-चलान पेमेंट पेज उघडावे.
  • त्यानंतर पेटीएमवर संबंधित ऑथोरिटीची निवड करावी.
  • त्यानंतर चलानची रक्कम जाणून घेण्यासाठी चलान नंबर, वाहन नंबर अथवा ड्रायव्हिंग लायसेंस टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही ई-चलान भरून शकता.

Leave a Comment