या देशात लाकडांपासून बनवली 24 मजली इमारत


घर बनवण्यासाठी सिमेंट, वीट, रेती यासारख्या अनेक गोष्टींचा वापर केला जातो. मात्र चीनमधील एक इमारत पाया सोडून पुर्णपणे लाकडांचा वापर करून बनवण्यात आली आहे. 24 मजली इमारतीची उंची 99.9 मीटर आहे.

(Source)

पुर्णपणे इकोफ्रेंडली असणाऱ्या या इमारतीमध्ये 150 खोल्या आहेत. इमारातीला मजबूत बनवण्यासाठी देवदारच्या लाकडांचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीच्या भितींपासून ते छतापर्यंत प्रत्येक गोष्ट लाकडापासून बनवण्यात आली आहे.

(Source)

चीनच्या गुइझोई प्रांतातील यिंगशान शहरातील ही इमारत सध्या रिकामीच आहे. मात्र पर्यंटकांना बघण्यासाठी इमारत उघडण्यात आली आहे. ही इमारत बघण्यासाठी लांबून पर्यटक येतात. त्यांच्यासाठी ही इमारत एक आश्चर्यच आहे.

(Source)

लाकडापासून बनलेल्या या इमारतीची निर्मिती आर्किटेक्ट सुइ हँगने केले आहे. ही इमारत बनवण्यासाठी दोन वर्ष लागले. सुइ हँगने सांगितले की, या इमारतीचे डिझाईन तीन वर्षांपुर्वीच बनवण्यात आले होते.

Leave a Comment