हे राजमहाल नावापुरतेच, मात्र यामध्ये राजाचा नाही, तर भुतांचा वास !

scary
भुतांच्या कथा आपण अगदी लहानपणापासून घरातील मोठ्या मंडळींकडून आणि मित्र मैत्रिणींकडून ऐकत आलो आहोत. त्या जागी खरोखरच कोणी भुते पहिली असतील किंवा नाही याची खात्री कोणीही देऊ शकत नाही, मात्र या ठिकाणांशी निगडित कहाण्यांमुळे या ठिकाणी जाण्यासाठी कोणीही धजावत नाही. अश्या जागांच्या बद्दल आपल्या मनातील भीती, या जागांशी निगडित रहस्ये, आणि तिथे गेल्यावर अनेकांनी अनुभवलेली बेचैनी हा निव्वळ योगायोग म्हणता येईल का? या गोष्टींमध्ये खरोखरच किती तथ्ये आहेत, हे कोण सांगू शकेल? जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जी नकारात्मक शक्तीने झपाटलेली असल्याच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. या ठिकाणांमध्ये जुनी, पडीक घरे आहेत, हवेल्या आहेत, जंगले आहेत, आणि राजमहालही आहेत.
scary1
स्कॉटलंड येथील एडिनबर्ग कॅसल हे असेच एक ठिकाण आहे. या मध्ययुगीन राजमहालाविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हा महाल बाहेरून दिसायला जितका भव्य आहे, तितकाच तो आतून पडीक, दुर्लक्षिलेला आहे. एका डोंगरावर वसलेल्या या महालाच्या सभोवताली जंगल आहे. हिरव्यागर्द वनराईने वेढलेला हा एकाकी किल्ला रात्रीच्या वेळी आणखीनच भीतीदायक, गूढ भासतो. अनेक वर्षांपूवी या किल्ल्यामध्ये काही सैनिक युद्धाच्या वेळी मारले गेले. हे सर्व सैनिक अमेरिकन स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभागी झाले असता, प्लेगची लागण होऊन त्यामुळे मृत्यू पावले. या मृत सैनिकांचे आत्मे अजूनही या ठिकाणी वास करतात अशी आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे. या महालातून या सैनिकांच्या वेदनेने भरलेल्या हाका आजही ऐकू येत असल्याचे येथील स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
scary2
ब्रिटनमधील डेव्हॉनच्या जवळ असलेल्या पॉमरॉय कॅसलची कथा चौदाव्या शतकातील आहे. या काळी या महालामध्ये वास्तव्य असणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींमध्ये महालाच्या मालकी हक्कावरून चांगलेच भांडण जुंपले. या भांडणापायी मोठी बहिण एलिनोर हिने धाकटी बहिण मार्गारेट हिला कैदेमध्ये डांबले. कैदेमध्ये मार्गारेटचे फार हाल झाले व त्यातच ती मरण पावली. आणखी एका आख्यायिकेनुसार मार्गारेटची हत्या करविण्यात आली. मार्गारेटच्या मृत्यूनंतर येथे मार्गारेटचा मृतात्मा अनेकांनी पाहिल्याचे म्हटले आहे. सफेद परीधानामध्ये दृष्टीला पडणाऱ्या या आकृतीला ‘व्हाईट लेडी’ असे म्हटले जाते. हा महाल शापित असून, यामध्ये एकदा कोणी शिरले, तर ती व्यक्ती जिवंत बाहेर येत नाही असे येथील स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे.
scary3
ऑस्ट्रेलिया येथील मॉन्टे क्रिस्टो येथील महालाचे दरवाजे अचानक आपोआप उघडतात आणि तसेच बंदही होतात. हे नेमके कसे घडते याचे रहस्य आजवर उकलले न गेल्याने जगातील सर्वात भीतीदायक ठिकाणांमध्ये या महालाचा समावेश आहे. या महालामध्ये कधी अचानक तेजस्वी प्रकाश दिसून येतो, तर कधी मिट्ट काळोख असतो. या ठिकाणी घडणाऱ्या अनेक चित्र विचित्र घटनांचे वर्णन करणारे व्हिडीयोज यू ट्यूबवर आहेत. लंडन येथील हायगेट सेमिट्रीची इमारत वास्तविक अतिशय देखणी आहे. पण या वास्तूचा इतिहास अतिशय रक्तरंजित आहे. फोटोग्राफीच्या दृष्टीने अतिशय सुंदर व्हेन्यू मानल्या गेलेल्या या ठिकाणी एके काळी अनेक हत्या झाल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी नकारात्मक शक्तीचा प्रभाव असल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे.

Leave a Comment