शरणार्थ्याने प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून बनवले घर


अल्जेरिया येथील शरणार्थींच्या कॅम्पमध्ये एका व्यक्तीने रिसायक प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करून घर बनवले आहे. ततेह लेहबिब बरिका असे घर बांधणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, वेस्टर्न सहारामधून निर्वासित झालेल्या अल्जेरिया येथील सहारवी कॅम्पमध्ये त्याचा जन्म झालेला आहे.

त्याने सांगितले की, माझा जन्म एक साध्या विटांच्या घरात झाला. घराचे छत हे झिंकच्या शिट्स पासून बनवण्यात आलेले आहे. ते उष्णता वाहक आहे.

युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सीकडून स्कॉलरशिप मिळाल्यानंतर त्याने रिनेव्हेबल एनर्जीचे शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यावर ततेहने कॅम्पमध्ये परतत पर्यावरणासाठी योग्य असे काहीतरी करण्याचा निर्णय घेतला व त्याने प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये माती भरत सिमेंटद्वारे त्या बाटल्यांचे घर बांधले. त्याने सांगितले की, कॅम्पमध्ये परतल्यावर मला माझ्या आजीला राहण्यासाठी एक चांगले घर बनवायचे होते.

Crazy With Bottles

Tateh uses recycled plastic bottles to build new homes ♻️

Posted by UNHCR, the UN Refugee Agency on Friday, September 20, 2019

युनायटेड नेशन्स रिफ्युजी एजन्सीकडूनने या घराचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक जणांनी बघितला आहे. तर यावर शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत.

अनेक युजर्सनी ततेहच्या या कामगिरीचे कौतूक केले आहे. तर काहींनी प्लास्टिकचा योग्य वापर केल्याचे देखील म्हटले.

Leave a Comment