हे जोडपे करतात खुर्ची आणि टेबलच्या आकाराप्रमाणे झाडांची वाढ


झाडे उगवताना तर तुम्ही अनेकदा पाहिली असतील. त्यांची वाढ देखील एकाच आकारात सरळ वरच्या दिशने होते असते हे देखील आपल्याला माहिती आहे. मात्र तुम्ही कधी झाडाला खुर्ची अथवा टेबलच्या आकाराप्रमाणे वाढताना  पाहिले आहे का?  इंग्लंडमधील गॅविन आणि एलिस हे कपल झाडांना फर्निचरच्या आकारामध्ये वाढवतात. इंग्लंडच्या मिडलॅन्ड येथे या कपल्सचे दोन एकरचे फार्म आहे.

डेर्बिशायर येथील आपल्या फर्निचर फार्ममध्ये हे कपल 250 खुर्च्या, 100 दिवे आणि 50 टेबल झाडांची काळजी घेतात. खुर्च्या, टेबलच्या आकारातच झाडांची वाढ होते. गॅविन म्हणतो की, 50 वर्ष झाडे वाढवायची आणि त्यानंतर त्यांना कापून कापून छोटे करण्याऐवजी त्यांना थेट तुम्हाला हव्या असलेल्या आकारातच वाढवणे चांगले आहे. हे एकप्रकारे झेन 3डी प्रिटिंगप्रमाणे आहे.

(Source)

लहानपणी एका बोन्सई झाडाला खुर्चीच्या आकाराप्रमाणे बघून गॅविनला अशाप्रकारे झाडे वाढवण्याची कल्पना सुचली होती. गॅविनला जन्मताच पाठीच्या कण्याचा त्रास होता. अनेकवर्ष पाठीच्या कण्याला आधार देण्यासाठी त्याला मेटल फ्रेम वापरावी लागली.

(Source)

44 वर्षीय गॅविनने सुरूवातीला 2006 साली पीक या ठिकाणी दोन झाडे खुर्च्यांच्या आकाराप्रमाणे वाढवण्याचा प्रयोग केला. त्यानंतर 2012 ला लग्नाच्या एका वर्षानंतर गॅविन आणि एलिसने या झाडांना हवा तसा आकार देणारे फर्निचर बनवण्यासाठी कंपनीच स्थापना केली.सुरूवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्यांदा लावलेली झाडे गाई आणि सशांनी खाल्ली.

झाडांपासून बनवण्यात येणाऱ्या वस्तूंची किंमत देखील कमी नाही. एका खुर्चीची किंमत 10 हजार पाउंड्स, दिव्याची किंमत 900 ते 2300 पाउंड्स आणि टेबलची किंमत 2500 ते 12500 पाउंड्सच्या दरम्यान आहे.

(Source)

एका खुर्चीची वाढ होण्यासाठी साधारणपणे 6 ते 9 वर्ष लागतात व एक वर्ष सुकण्यासाठी जाते. कंपनीला एका ग्राहकाने वर्ष 2030 साठी कमिशन देखील दिले आहे. त्या ग्राहकाला त्याच्या निवृत्तीनंतर खुर्ची हवी आहे.

प्राचीन रोमन, चीनी आणि जापानी लोक देखील अशाप्रकारे झाडांविविध आकारांमध्ये वाढवत असे. या कपलला वेगवेगळ्या प्रयोगासाठी फॉर्मची गरज आहे. तसेच झाडांना अशा प्रकारे वाढ करण्याची माहिती सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी देखील ते प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment