कधी कधी असे होते की, आपल्या घरात एखादी खूप बहुमुल्य वस्तू ठेवलेली असते व आपल्याला त्याबद्दल माहितीच नसते आणि ज्यावेळी आपल्याला त्या वस्तूबद्दल समजते तेव्हा आपण देखील हैराण होता. असेच काहीसे फ्रांसच्या कॉम्पैनियन शहरात राहणाऱ्या महिलेबरोबर झाले आहे. तिच्या किचनमध्ये वर्षांनुवर्ष एक पेंटिंग लटकलेली होती. मात्र त्या महिलेला त्या पेटिंगच्या किंमतीबद्दल काहीही माहिती नव्हते. जेव्हा समजले तेव्हा ती काही क्षणात कोट्याधीश झाली.
धुळखात पडलेल्या पेंटिंगने महिला क्षणात झाली कोट्याधीश
फिलोमेन वोल्फ नावाच्या महिलेने पेटिंग किचेनमध्ये शेगडीच्या वरती लटकवले होते. तिला वाटायचे की, ती सर्वसाधारण पेटिंग आहे. कुटुंबाने धार्मिक प्रतिक म्हणून पेटिंग घरात ठेवली होती. ती तिचे घर विकत असताना तिला या पेटिंगबद्दल माहिती मिळाली.
या महिलेने जूनमध्ये तिचे घर विकून नवीन घर घेण्याची योजना बनवली होती. महिलेचे घर 1960 मध्ये बनले होते, त्यामुळे घरात ठेवलेल्या सामानाची किंमत लावण्यासाठी तिने लिलाव करणाऱ्यांना बोलवले. यावेळी लिलाव करणाऱ्यांनी त्या पेटिंगची जी किंमत सांगितली त्याने सर्वचजण आश्चर्यचकित झाले.
लिलाव करणाऱ्यांच्या मते, ही पेटिंग 13 व्या शतकातील आहे. सांगण्यात येते की, 1280 मध्ये ही पेटिंग बनवण्यात आली होती. ही पेटिंग प्रसिध्द पेंटर चिमाबुएने बनवले आहे. चिमाबुएला सेनी-डी-पेपो नावाने देखील ओळखले जाते.
या पेटिंगची किंमत 31 कोटी रूपये ते 46 कोटींच्या मध्ये सांगितले जात आहे. या पेटिंगची लांबी 26 सेटींमीटर आणि रूंदी 20 सेंटीमीटर आहे. सेनी-डी-पेपोने ख्रिश्चन धर्माची माहिती देणाऱ्या अशाप्रकारच्या 8 पेटिंग्स बनवल्या होत्या. ही पेटिंग त्यापैकीच एक आहे. अशाच दोन पेटिंग यावेळी लंडनच्या नॅशनल गॅलेरीमध्ये आहेत.
या पेटिंगचा लिलाव 27 ऑक्टोंबरला होणार आहे. महिलेच्या घरातून अन्य 100 बहुमुल्य वस्तू देखील मिळाल्या आहेत. त्यांची किंमत 4 लाख 65 हजार सांगितली जात आहे.