ऑनलाईन शॉपिंग करण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होईल फसवणूक


अवघ्या काही दिवसात देशभरात सणासुदांचा धुमधडाका उडणार आहे. त्या दरम्यान आपल्यापैकी अनेकजण ऑनलाईन शॉपिंगलाचा सर्वाधिक पसंती देणार आहेत यात काडीमात्र शंका नाही. पण ही शॉपिंग करताना तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकता. कारण ऑनलाईन सेलमधून वस्तू खरेदी करुन काही ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या घटना गेल्या काही वर्षात घडल्या आहेत. 2014 नंतर भारतात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेन्ड अधिक वाढत गेला. तर येत्या दोन-तीन दिवसात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर फेस्टिव्ह सीजन सेलला सुरुवात होणार आहे. या दोन्ही ई- कॉमर्स वेबसाइटवर 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबर दरम्यान फेस्टिव्ह सीजन सेलचे आयोजन करण्यात आले आहे. बरेच इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्ससह फॅशन, होम अप्लायंसेज पर्यंतच्या सर्व गोष्टींवर या सेलमध्ये सुट देण्यात येणार आहे.

जगभरातील मोठ्या कंपन्यामधील वॉलमार्ट, अलीबाबा, अॅमेझॉन ऑनलाईन पद्धतीने शॉपिंगच्या व्यवहारामुळे भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. पण गेल्या वर्षात 30 जुलैला सरकारकडून ऑनलाईन सेक्टरच्या नियमाबाबत एक पॉलिसी बनली आहे. या पॉलिसीनुसार ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीपासून वाचणे हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ऑनलाईन सेलमधून वस्तू घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी नाहीतर फसवणूक होण्याची फार शक्यता असते.

ऑनलाईन शॉपिंग करताना बहुतांश ग्राहक एखाद्या प्रोडक्टसाठी रेटिंग किती दिली आहे हे तपासून पाहतात. रेटिंग जर उत्तम असेल तर ग्राहक खरेदी करण्याचा विचार करतात. पण ऑनलाईन साईटवर प्रोडक्टबाबत देण्यात आलेली रेटिंग काही वेळेस फेक असतात. ऑनलाईन खरेदी करताना काही ग्राहक त्याचा रिव्हू किंवा फोटो पाहूनच ती वस्तू खरेदी करतात. पण असे केल्यास काही वेळेस खरेदी केलेले प्रोडक्टस उत्तम दर्जाचे नसल्याचे दिसून येते. ती वस्तू अशा परिस्थितीत परत देण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या नाटक करतात.

तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेली वस्तू ग्राहकांकडून परत केली जाते. ग्राहकाला त्यानंतर 14 दिवसात त्या वस्तू बाबत रिफंड देणे अनिवार्य आहे. त्याचसोबत ग्राहकांच्या तक्रारीवर 30 दिवसाच्या आतमध्ये तोडगा काढणे सुद्धा गरजेचे आहे. तसेच तुम्ही ज्या व्यक्तीकडून प्रोडक्ट खरेदी करत असल्यास त्याची संपूर्ण माहिती त्याला देणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे रिप्लेसमेंट पॉलिसीबाबत प्रत्येक ग्राहकाने अधिक जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

तसेच एखादे प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी अन्य ठिकाणी सुद्धा त्याबाबत अधिक माहिती घ्या. तर कोणत्याही ब्रॅन्डची वस्तू खरेदी करत असल्यात त्याच्या शॉपिंग पोर्टल किंवा जागेची माहिती घ्या. त्याचसोबत खरेदी करणाऱ्या वस्तूचा ब्रॅन्ड विश्वासनीय असेल तरच खरेदी करा. त्याचबरोबर अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने खरेदी करत असल्यास त्यांच्या रिर्टन पॉलिसीबाबत जाणून घ्या.

Leave a Comment