तु्म्ही पाहिले आहे का 3000 पानांचे अनोखे रामचरितमानस ?


जयपूरमध्ये राहणाऱ्या शरद माथूर या कलाकाराने 3000 पानांचे हस्तलिखित रामचरितमानस लिहिले आहे. हे 21 खंडामध्ये तयार करण्यात आले आहे. या रामचरितमानसची खास गोष्ट म्हणजे माथूरने ऑईल पेंट आणि ब्रशचा वापर करून हे लिहिले आहे. याचे वजन 150 किलोग्राम आहे. शरद माथूर यांची रामचरितमानस अयोध्येमध्ये होणाऱ्या राममंदिराला भेट देण्याची इच्छा आहे.

शरद सांगतो की, रामचरितमानस लिहिण्याची सुरूवात त्याने 2013 ला केली होती. सर्वात प्रथम मोठ मोठ्या अक्षरांमध्ये सुंदर काण्ड लिहिले. कारण अनेकांना छोट्या अक्षरांमध्ये लिहिलेले वाचण्यात अडचण येते. रोज दोन पाने लिहायचो. यासाठी 3 ते 5 तास लागत असे. हे काम 6 वर्ष सुरू होते. माझी इच्छा आहे की, जेव्हा राम मंदिर बनेल तेव्हा हाताने लिहिलेले हे रामचरितमानस तेथे ठेवावे.

संगीताचे शिक्षण देणाऱ्या शरद माथूर म्हणाला की, रामचरितमानसचे सुरूवातीची 100-200 पाने खराब झाली होती. त्यामुळे सर्व पाने लॅमिनेट केली. संगीत शिकवल्याने होणाऱ्या कमाईतून घर चालते. समजाकडून कोणतीही मदत मिळत नाही. नैतिक बळ मात्र मिळते. मला त्याचीच जास्त गरज आहे.

 

Leave a Comment