इंस्टाग्रामद्वारे लाखो रूपये कमवते हे जोडपे, खरेदी केले शानदार घर


एक कपल इंस्टाग्रामवर एवढे प्रसिध्द आहे की, ते इंस्टाग्रामवरून तब्बल सहा आकडी कमाई करतात. ब्रिटनमध्ये राहणारे जॅक मोरिस आणि ऑस्ट्रेलियाची लॉरेन बुलेन ट्रॅव्हल ब्लॉगर आहेत. ते दोघांचेही इंस्टाग्रामवर क्रमशः 27 लाख आणि 21 लाख फॉलोवर्स आहेत. काही दिवसांपुर्वीच दोघांनी बालीमध्ये घर घेतले आहे.

(Source)

या कपलने इंस्टाग्रामद्वारे होणाऱ्या कमाईतून हा बंगला बांधला आहे. त्यांनी 1 वर्षांपुर्वीच जमीन खरेदी केली होती.

(Source)

जॅकने लिहिले की, कधी विचार केला नव्हता की, स्वप्नातील एका मुलीबरोबर घरापासून 7 हजार मील दूर स्वतःसाठी घर घेईल. 29 वर्षीय जॅक स्पॉन्सरशीप डील आणि इंस्टाग्रामवर ब्रँडेट कंटेटद्वारे कमाई करतो.

(Source)

याआधी कपलने म्हटले होते की, 2 लाख रूपयांपेक्षा कमी पैशांमध्ये स्पॉन्सर्ड पोस्ट नाही करणार. केवळ एका पोस्टसाठी जॅकला जवळपास 6 लाख रूपये मिळालेले आहेत. तर लॉरेनला एका पोस्टसाठी 5 लाख रूपये देखील मिळालेत.

(Source)

याआधी जॅक एका फोन कंपनीसाठी काम करायचा. कपलच्या या नवीन घरामध्ये लग्जरी पूल, सिनेमा स्क्रीन आणि सुंदर किचन आहे. जॅकने घराच्या डिझाईनचे क्रेडिट गर्लफ्रेंड लॉरेनला दिले आहे.

Leave a Comment