हैद्राबादच्या कारवेड्याने बनवल्या आहेत भन्नाट कार; तुम्ही पण बघाच


तुम्ही कधी बुटाच्या आकाराची, वांग्या सारखी दिसणारी कार बघितली आहे ? नाही ना. मात्र हैद्राबादमध्ये राहणाऱ्या सुधाकरकडे बुट, बांगे, पेन्सिल, बॉल अशा विविध गोष्टींप्रमाणे 55 हटके कार आहेत. सुधाकरचे हे कार संग्रहालय देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

सुधा कार म्युझियमचा मालक असलेला सुधाकर सांगतो की, मला लहानपणापासूनच कार बनवण्याची आवड आहे. 90 च्या दशकात मी अमेरिकेत असताना एका कार्निव्हलमध्ये मी स्केटिंग बूटाच्या सारखी कार बघितली होती. त्या कारमुळे मला हटके आकाराच्या कार बनवण्याची प्रेरणा मिळाली. बुटा सारखी दिसणारी कार हे माझे पहिले डिझाईन होते. त्यानंतर मी हेल्मेट, वांगे अशा आकाराच्या कार बनवल्या.

Posted by Sudhacars Museum on Friday, August 16, 2013

सुधाकरणे 70 सीटेर बस, डबल डेकर बस देखील बनवल्या आहेत, पर्यटकांना त्या फारच आवडतात. लोकांना काहीतरी विचित्र आणि हटके बघायला आवडते, असे सुधाकर सांगतो.

1990 आणि 2000 साला दरम्यान सुधाकरने हुसैन नगर जवळ अनेक कार्यक्रम देखील आयोजित केले होते. लोकांना ते फारच आवडले होते. तेव्हापासून सुधाकरने अशाच विचित्र आणि हटके कार बनवण्याचे ठरवले. त्यानंतर ठराविक प्रसंगाप्रमाणे कार बनवत असतो. फिफा वर्ल्ड कप दरम्यान फुटबॉलच्या  कार, ख्रिस्मसच्या वेली झाडाप्रमाणे दिसणारी कार आणि गणपतीच्या वेळी लाडूप्रमाणे दिसणारी कार अशा विविध हटके कार तो बनवत असतो.

Posted by Sudhacars Museum on Friday, October 4, 2013

सुधाकरने सांगितले की, जंकयार्कमधून जमा केलेल्या स्क्रॅपपासून कार बनवण्यात येते. प्रत्येक गाडीचे सस्पेंशन आणि व्हिलची जागा वेगळी असते. त्यामुळे एक कार बनवण्यासाठी तीन महिने ते एक वर्षांचा कालावधी लागतो. आतापर्यंत माझ्याकडे 55 हटके कार आहेत, माझे लक्ष्य 100 कारचे आहेत. माझे टारगेट पुर्ण करायला 10 ते 15 वर्ष जातील.

Posted by Sudhacars Museum on Thursday, December 5, 2013

इंजिनिअरचे विद्यार्थी देखील त्यांच्या शेवटच्या वर्षाच्या प्रोजेक्टसाठी 25 हजारात कार कशी बनवायची यासाठी मार्गदर्शनासाठी सुधाकर यांच्याकडे येतात. अनेक पर्यटक याठिकाणी या हटके कार बघण्यासाठी भेटी देतात.

Leave a Comment