जगातली सर्वात महागडी कॉफी, जाणून घ्या एका कपाची किंमत

जापानच्या ओसाका शहरात एक असे कॉफी हाऊस आहे जेथे 22 वर्ष जुनी कॉफी मिळते. येथे एक कप कॉफीची किंमत तब्बल 65 हजार रूपये आहे. ही जगातील सर्वात जुनी आणि महागडी कॉफी आहे.

मंच हाऊस जगातील एकमेव कॅफे आहे, जेथे दोन दशकांपेक्षा अधिक जुनी कॉफी ताजी करून दिली जाते. कॅफेचे मालक तनाका एकेकाळी आइस कॉफी विकायचे. यासाठी ते कॉफी फ्रिजमध्ये ठेवायचे. जेणेकरून कॉफी लवकर तयार होईल. मात्र एकदा कॉफीचे काही पॅकेट्स फ्रिजमध्ये तसेच राहिले. ही पॉकिट दीड वर्ष फ्रिजमध्ये होती. जेव्हा तनाका यांना ही पॉकिट दिसली, त्यावेळी त्यांनी ती फेकून देण्याऐवजी त्याची कॉफी बनवली. जुन्या कॉफीचा स्वाद कसा लागतो, हे त्यांना पाहायचे होते.

तनाका सांगतात की, जेव्हा दीड वर्ष जुनी कॉफी त्यांनी बनवली तेव्हा त्या कॉफीचा स्वाद पाहून मलाही आश्चर्य वाटले. ती तेव्हाही पिण्या योग्य होती.  तेव्हाच मी ठरवले की, कॉफी अनेकवर्ष स्टोरमध्ये बंद करणार व ग्राहकांना एका वेगळ्या प्रकारची कॉफी देईल.

तनाका यांनी एक दशक कॉफीला लाकडाच्या छोट्या छोट्या बॅरलमध्ये स्टोर केले. 10 वर्षांनंतर कॉफी एखाद्या सीरप प्रमाणे लागत होती. तनाका यांनी 20 वर्ष कॉफी स्टोर केली, तेव्हा त्या कॉफीचा स्वाद अल्कोहल प्रमाणे होता. ग्राहकांना ती कॉफी खूपच आवडली.

तनाका कॉफी बारीक केल्यानंतर कापडाच्या चाळणीत टाकतात. त्यानंतर त्यावर गरम पाणी टाकतात. यामुळे कॉफीचा कडूपणा निघून जातो. त्यानंतर त्यातून निघणारे द्रव्य लाकडाच्या बॅरलमध्ये स्टोर करण्यात येते. 2 दशकानंतर बॅरलला असलेल्या नळांद्वारे कॉफी काढली जाते.

Leave a Comment