असे जाणून घ्या ट्रायल रूममध्ये लपवलेला छुपा कॅमेरा


तुम्ही आतापर्यंत हॉटेल रूम, चेंजिंग रूममध्ये कॅमेरे लपवल्याची अनेक प्रकरणे ऐकली असतील. अशा घटना मॉल, कपड्यांच्या दुकानात तर हमखास घडत असतात. याला तुम्ही देखील बळी पडू नये यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही तुम्हाला आज अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही चेंजिंग रूममधील छुप्या कॅमऱ्याबद्दल जाणून घेऊ शकता.

ट्रायल रूममध्ये गेल्यावर कपडे बदलण्यापूर्वी लाइट बंद करा आणि मोबाइलचा टॉर्च सुरू करून तो आरशावर पाडा. लाइट दुसऱ्या बाजूला जात असेल तर समजून जा काहीतरी गडबड आहे. लाइट आरपार गेला नाही तर समजून जा ट्रायल रूम सेफ आहे. एकदा आरशावर नॉक करून पाहा. आवाज सामान्य असल्यास चेंजिंग रूम सेफ आहे.

आरसा दोन्ही बाजूने असल्यास पोकळ वस्तूवर नॉक केल्याप्रमाणे आवाज येईल. अशावेळी दुसरीकडून तुमच्यावर नजर ठेवली जात असल्याचे समजावे. साधा उपाय करायचा असल्यास आरशावर बोट ठेवा. काही गडबड नसेल तर तुमच्या बोटात आणि आरशात एक गॅप दिसून येईल. पण जर दोन्हीमध्ये गॅप नसेल तर त्या आरशात गडबड आहे हे समजून घ्यावे.

Leave a Comment