आश्चर्यच ! मागील 118 वर्षांपासून अविरत सुरु आहे हा बल्ब


सर्वसाधारणपणे बल्ब खरेदी केल्यावर कंपन्या त्यावर 1 ते 2 वर्षांची गॅरेंटी देत असतात. मात्र असे खुप कमी वेळा होते की, बल्ब सतत 2 ते 3 वर्ष खराबच झाला नाही व तो सतत पेटत आहे. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एक बल्ब असा आहे जो, मागील 118 वर्षांपासून पेटतच आहे. आजपर्यंत या बल्बचा फ्यूज गेलाच नाही.

(Source)

या बल्बला सेंटेनियल बल्ब म्हणून ओळखले जाते. कॅलिफोर्नियाच्या लिवरमोर शहरातील अग्नीशामक दलाच्या केंद्रामध्ये हा बल्ब 1901 ला लावण्यात आला होता. तेव्हापासून हा बल्ब पेटताच आहे. हा बल्ब शेल्बी इलेक्ट्रिक कंपनीने बनवला होता.

(Source)

1937 मध्ये वीजेची तार बदलण्यासाठी हा बल्ब पहिल्यांदा बंद करण्यात आला होता. तार बदलल्यानंतर बल्ब पुन्हा सुरू करण्यात आला. या बल्बची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद आहे. या बल्बवर सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते.

(Source)

चार वॉल्टचा हा बल्ब 24 तास पेटताच असतो. 2001 मध्ये या बल्बचा 100 वा जन्मदिवस साजरा करण्यात आला. त्यादिवशी संगीत पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले होते.

(Source)

या बल्बला बघायला लांबून लोक येतात. या बल्बमुळे अग्नीशामक दलाला संग्रहालयाचे स्वरूप आले आहे.

(Source)

2013 मध्ये बल्ब आपोआप बंद झाला होता. त्यावेळी लोकांना वाटले की, त्याचा फ्यूज गेला. मात्र तपासणी केली असता तार खराब झाली होती. त्यानंतर तार बदलत बल्ब पुन्हा पेटवण्यात आला.

Leave a Comment