आयुष्य जगाताना आपण कसे जगतो, हे सर्वात महत्त्वाचे असते. आयुष्य जगाताना आपण जे कार्य करतो, त्याद्वारेच मनुष्याची ओळख होत असते व त्यानेच तो महान बनतो. मनुष्याचे हेच कार्य इतर लोकांसाठी प्रेरणास्रोत बनते. काहीसे असेच काम दिल्लीच्या आंचल शर्मा करत आहेत.
कर्कग्रस्त महिला दररोज शेकडो गरीब मुलांचे भरते पोट
आंचल यांच्या जीवनात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही. सध्या आंचल शर्मा कॅन्सरशी लढा देत आहेत. मात्र कॅन्सर झाला म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा त्या इतरांना आनंद देत आहेत. आंचल दिल्लीच्या रंगपुरी भागातील 100 ते 200 गरीब मुलांना दररोज जेवण देतात. कोणत्याही औषधांपेक्षा गरीब मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य त्यांच्यासाठी चांगला उपचार ठरत आहे.
आंचलला घरगुती हिंसा, फसवणूक आणि छोट्या बहिणीची हत्या अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागलेले आहे. यानंतर 2017 मध्ये त्यांना तिसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे समजले.
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आंचलचे वडिल ऑटो चालक होते. काही लोकांच्या सांगण्यावरून त्यांनी त्यांच्या आयुष्याची संपुर्ण कमाई एका ठिकाणी गुंतवले. मात्र गुंतवणूक केलेले सर्व पैसे बुडाले. आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे आंचलच्या आईला कारखान्यात काम करावे लागले. मात्र त्यांचीही नोकरी गेल्या. या सर्व गोष्टींमुळे आंचल आणि त्यांच्या भावाला शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले. एका मित्राने आंचलला रिअल इस्टेटमध्ये एजेंटचे काम लावले, मात्र तेथेही त्यांची 2.5 लाख रूपयांना फसवणूक झाली.
आंचल एकेदिवशी उपचार घेऊन परत येत असताना, त्यांना ट्रॅफिक सिग्नलवर एक लहान मुलगा भिक मागताना दिसला. त्या मुलाला पैसे देण्याऐवजी ढाब्यावर घेऊन गेल्या. मात्र त्या मुलाचे कपडे पाहून ढाब्याच्या मालकाने जेवण देण्यास नकार दिला. तेव्हापासून त्या दररोज घरून जेवण बनवून आणतात व रंगपुरी येथील मुलांना देतात.
आंचलने यासाठी ‘मील ऑफ हॅप्पीनेस’ नावाचा एनजीओ देखील सुरू केला आहे. त्यांचे स्वप्न आहे की, दरदिवशी 5000 गरीब मुलांना जेवण द्यावे. यासाठी त्या क्राउंड फंडिग देखील करत आहेत. आंचल यांच्या या प्रयत्नांना मॅक्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांना ‘निडर हमेशा’ या पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.