मानवाचे डेनिसोंवस ( विलुप्त झालेली प्रजाती) पुर्वज एक लाख वर्षांपुर्वी पृथ्वीवर राहायचे, ते कसे दिसायचे या सर्व गोष्टींचा केवळ अंदाज लावता येत असे. डेनिसोंवसची हडं गुलाबी रंगाची, तीन दात आणि खाली झुकलेला जबडा असायचा. मात्र आता त्यांचा चेहरा देखील सापडला आहे.
1 लाख वर्षांपुर्वी असे दिसायचो आपण
डेनिसोंवस ही विलुप्त झालेली मनुष्याची प्रजाती सायबेरियाच्या दक्षिण पुर्व आशियामध्ये पसरलेली होती. आता अनुवंशिक डेटाचा वापर करून वैज्ञानिकांनी या पुर्वजांचे पुनर्निमाण केले आहे.
इस्त्रालयातील जेरूसलेम येथील हिब्रू विश्वविद्यालयातील संशोधक लेखक लिरान कार्मेल यांनी सांगितले की, आम्ही डेनिसोंवसचे स्केलेटल (सापळा) चे पुनर्निर्माण केले आहे.
कार्मेल यांनी सांगितले की, अनेक गोष्टींमध्ये डेनिसोवंस आणि निएंडरथलमध्ये साम्य होते. काही गोष्टींमध्ये ते आपल्या प्रमाणेच होते. मात्र काही गोष्टीत ते वेगळे होते.
संशोधकांनी 54 एनाटोमिकल फिचरची ओळख केली आहे. त्यामध्ये डेनिसोवंस ह आधुनिक मानव व निएंडरथल पेक्षा वेगळे होते. कवटीमध्ये 34 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे संशोधन ‘सेल’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.