दररोज अनोखळी लोकांना भेटतो हा व्यक्ती, 4 वर्षात केली 2800 जणांबरोबर मैत्री


अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथे राहणारा 28 वर्षीय रॉब लॉलेस दररोज कमीत कमी एका अनोखळी व्यक्तीबरोबर गप्पा साधतो. लॉलेस 2015 पासून असे करत आहे. आतापर्यंत लॉलेस अशा पध्तीने 2800 अनोळखी लोकांना भेटला आहे. त्याचा प्रयत्न असतो की, दररोज चार अनोळखी लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारायच्या.

लॉलेस यामागचे कारण सांगतो की, वेगवेगळ्या लोकांना भेटून वेळ घालवणे हा सर्वात चांगला प्रयत्न आहे, मला ते आवडते. जसजसे आपल्याला तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची सवय झाली आहे, तसा आपला मानवी संपर्क कमी झाला आहे.

शिक्षण पुर्ण झाल्यानंतर लॉलेसला एक मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी काम करताना त्याला जाणीव झाली की, ज्याप्रमाणे लोकांना भेटायची त्याला सवय होती, ती आता राहिलेली आहे. त्याला कॉर्पोरेट वातावरणाची सवय नव्हती. यातून बाहेर येण्यासाठी त्याने 2015 साली 10 हजार लोकांशी मैत्री करण्याचे लक्ष्य समोर ठेवले. 2016 ला त्याने नोकरी सोडत लोकांना भेटण्यास सुरूवात केली.

फायनेंसमध्ये डिग्री घेतलेल्या लॉलेसच्या दिवसाची सुरूवात जिमपासून होते. जिमनंतर तो चार लोकांना भेटतो. प्रत्येक भेट ही 1 तासांची असते. ही भेट कॉफी शॉप, बीच कोठेही होते.

लॉलेस सांगतो की, कोणात्या व्यक्तीच्या आयुष्यात डोकावून बघण्याची माझी इच्छा नसते. मात्र जर कोणी स्वतःच्या आयुष्याबद्दल सांगत असेल तर मी ते ऐकतो. मी लोकांसाठी मैत्रीचे दरवाजे नेहमी उघडे ठेवतो.

Leave a Comment