2,000 करोड रूपयांचा सर्वात महाग व्हिडीओ गेम अजुनही अपुर्ण

वर्ष 2012 मध्ये क्राउड फंडिंग वेबसाइट किकस्टार्टरवर एका व्हिडीओ गेमसाठी फंड जमा करण्यात आला होता. सांगण्यात आले होते की, ही एक मल्टीप्लेयर ऑनलाइन गेम आहे, जी 2014 मध्ये लाँच केली जाईल. ही गेम तयार करण्याची जबाबदारी प्रसिध्द गेम डिझाइनर क्रिस रॉबर्ट्सला देण्यात आली होती.

क्रिस या कॅम्पेन गेमची वेबसाइट देखील चालवत होता. क्रिसने सांगितले होते की, जर 163.4 करोड रूपये (23 मिलियन डॉलर) जमा झाले तर कोणत्याही गुंतवणूक दाराची गरज लागणार नाही. त्याचे हे लक्ष्य 18 ऑक्टोंबर 2013 लाच पुर्ण झाले आहे. आतापर्यंत या गेमसाठी तब्बल 2,045 करोड रूपये जमा झाले आहेत. क्राउंड फंडिंगद्वारे जमा झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे.

मात्र एवढी रक्कम जमा केल्यानंतर देखील गेम कधी लाँच होणार याबाबत काहीही माहिती नाही. या गेमचे नाव स्टार सिटीजन आहे. ही एक स्पेस गेम असून, मायक्रोसॉफ्ट विंडोजसाठी ही गेम बनवण्यात आली आहे. यामध्ये खेळाडूंना एक-एक ब्रम्हांड खेळण्यास मिळेल. यासाठी 100 स्टार सिस्टम बनवण्यात येणार आहे. मात्र अद्याप एकही तयार झालेले नाही. क्रिसने केवळ 2 ग्रह, नऊ चंद्र आणि एक एस्टोरॉइड बनवले आहेत.

(Source)

वर्ष 2017 मध्ये क्रिसच्या खात्यात केवळ 100 करोड रूपये शिल्लक राहिले होते. त्याने फंडिंगद्वारे पुन्हा पैसे जमा केले. गेमवर लक्ष्य ठेवणारे विशेषज्ञ सांगतात की, हा कोणताही फ्रॉड नाही, मात्र हे मिस मॅनेजमेंटमुळे होत आहे. क्रिस वारंवार गेममधील फिचर वाढवत आहे. तसेच यातील कॅरेक्टर बदलत आहे.

क्रिसची कंपनी क्लाउड इंपिरियम गेम्समध्ये 537 कर्मचारी काम करतात. त्याचे अमेरिका, ब्रिटन, जर्मनी या ठिकाणी 5 ऑफिस आहेत.

क्रिसची पत्नी आणि भाऊ देखील त्याच्याच कंपनीत काम करतात. आतापर्यंत 11 लाख लोकांनी या गेममध्ये पैसे गुंतवले आहेत. गेम अद्याप लाँच न झाल्याने लोकांनी पैसे मागण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनकडे आतापर्यंत 129 तक्रारी आल्या आहेत. युजर्स केवळ गेमचे अल्फा मॉड्यूल खेळू शकत आहेत. पुर्ण गेम कधी लाँच होणार हे कोणालाच माहित नाही.

Leave a Comment