ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा येत्या दहा दिवसांत बाहेर काढणार – किरीट सोमय्या


मुंबई : ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा येत्या दहा दिवसांत बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून आर्थिक कमाईसाठी घाबरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, जरी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असला, तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसीमधील 2400 बेडपैकी 800 बेड्सवर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत, पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण हे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले, त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित असल्याचे सोमय्या म्हणाले.

सोमय्या म्हणाले की, ज्या पद्धतीने सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून घाबरवण्याचे काम करत आहेत ते का? कारण कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे. मी येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करणार असल्याचे ते म्हणाले. या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र येत्या दहा दिवसात मी जनतेसमोर आणणार असल्याचे ते म्हणाले.

सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिकेचे आयुक्त एवढे टेन्शन का पसरवत आहेत. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. आशिष शेलार यांना आलेल्या धमकीच्या फोनवर बोलताना सोमय्या म्हणाले की, शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. बघूया ठाकरे सरकार कशी काळजी घेतात.