कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबईतील 300 पेक्षा जास्त इमारती सील


मुंबई : राज्यावरील कोरोनाचे संकट आता उग्र रुप धारण करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे राजकीय नेते, मंत्री यांच्यासह सेलिब्रेटीदेखील कोरोनाबाधित होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या चार पटीने वाढली आहे. दरम्यान, मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील 20 टक्के पेक्षा जास्त लोक हे कोरोनाबाधित आले आहेत. दादर आणि दादर पार्क येथील भागात कंटन्मेंट झोन करण्यात आला आहे. माहिम आणि धारावी येथेही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत 300 पेक्षा जास्त इमारती सील करण्यात आल्या आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर मुंबईत, शुक्रवारी 20971 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच, 8490 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. मुंबईत शुक्रवारी 6 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 1395 कोरोनाबाधित अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. मुंबईतील रुग्णालयांमध्ये 35 हजारांहून अधिक कोरोना बेड्स तयार करण्यात आले असून त्यापैकी सध्या 6532 खाटा वापरात आहेत.

मुंबईत कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण चारपटीने वाढत आहेत. पण कोणीही घाबरुन जाऊ नये. 950 रुग्ण हे बीकेसीत दाखल आहेत. यापैकी 280 रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. एकही रुग्ण अतिदक्षता विभागात नाही, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. बीकेसीत 2 हजार 500 बेड्सची उपलब्धता आहे. 1 हजार 300 बेड्स विना ऑक्सिजनचे आहेत, तर 890 ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत. आपल्याकडे बीकेसीत एकही आयसीयूत पेशंट्स नाही. विरोधक लोकांना उकसवत असल्याचा आरोप यावेळी महापौर पेडणेकर यांनी केले आहे.