दिग्दर्शक-निर्माते मधुर भांडारकर यांना कोरोनाची लागण


दिग्दर्शक-निर्माते मधुर भांडारकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. परंतु, कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगत कोरोना नियमांचे सर्वांनी पालन करा, असे आवाहन भांडारकर यांनी केले आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील सर्वात जास्त ओमिक्रॉनचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान मुंबईतही कोरोनाबाधित वाढत आहे. कोरोनाने राजकीय मंडळी आणि बॉलिवूड कलाकारांभोवती विळखा घट्ट् केला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील 14 मंत्री आणि विविध राजकीय पक्षातील जवळपास 80 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बॉलिवूडमध्येही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मागच्या महिन्यात करण जोहरने आयोजित केलेल्या डिनर पार्टीत सहभागी झाल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांच्यासह आणखी सात ते आठ जणांना कोरोनाची लागण झाली होती.