पाकिस्तानी गोलंदाजाला धोनीने दिले स्पेशल गिफ्ट


नवी दिल्ली – एका पाकिस्तानी गोलंदाजाला भारताला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने एक खास भेट दिली आहे. आपली चेन्नई सुपर किंग्जची जर्सी धोनीने पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज हारिस राउफला भेट दिली आहे. या पाकिस्तानी गोलंदाजाने ही भेट मिळताच आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.


आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राउफने ट्विट केले आणि लिहिले, मला ही सुंदर भेट देऊन लेजेंड आणि कॅप्टन कूल धोनीने सन्मानित केले. सातवा क्रमांक आजही आपल्या वागण्याने लोकांची मने जिंकत आहे. @russcsk, तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. सध्या ऑस्ट्रेलियन लीग बिग बॅशमध्ये राउफ मेलबर्न स्टार्सकडून खेळत आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये या पाकिस्तानी गोलंदाजाने तीन विकेट घेतल्या आहेत.