बिग बजेट बडे मियाँ-छोटे मियाँत स्क्रिन शेअर करणार अक्षय कुमार-टायगर श्रॉफ


बॉलीवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांची जबरदस्त केमिस्ट्री असणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय आणि टायगर श्रॉफने एका अॅक्शन कॉमेडी चित्रपटासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जॅकी भगनानी यांच्या बॅनरखाली बडे मियाँ-छोटे मियाँ हा चित्रपट बनवण्यात येणार असून अली अब्बास जफर चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाची खासियत म्हणजे या चित्रपटाचे बजेट तब्बल 300 कोटी रूपये आहे.

अली अब्बास हे गेल्या अनेक दिवसांपासून दोन अभिनेत्यांची भूमिका असणारा चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत. या चित्रपटावरून अली अब्बास खूपच उत्साही आणि आनंदी आहेत. कारण त्यांच्यासाठी ही पहिलीच वेळ आहे की, दोन वेगवेगळ्या जनरेशनमधील दोन अभिनेत्यांना घेऊन हा चित्रपट बनत आहे.

सध्या अली अब्बास जफर यांच्या डॅडी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर महत्वाची भूमिका साकारत असून या चित्रपटाचे चित्रीकरण संपले की लगेच बडे मियाँ-छोटे मियाँ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, अक्षय कुमार आणि टागर श्रॉफला पडद्यावर एकत्र कसे आणायचे? यावर अली अब्बास यांचे काम सुरू आहे. बडे मियाँ-छोटे मियाँ चित्रपटाच्या 300 कोटी बजेटमधील जास्तीत जास्त रक्कम ही चित्रपट तज्ञांवरच खर्च होणार आहे. अली अब्बास चित्रपटासाठी शंभर कोटीच खर्च करणार आहेत. एका चित्रपटात दोन अभिनेत्यांची भूमिका असलेले खूप कमी चित्रपट बनवले जातात. परंतु, टायगर श्रॉफ आणि ऋतिक रोशन यांची भूमिका असलेल्या वॉर चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवल्यामुळे अब्बास यांनी दोन अभिनेत्यांना एकत्र घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.