टायटन आयप्लस कडून स्मार्ट आय एक्स ग्लासेस सादर
आयकेअर क्षेत्रातील दिग्गज टायटन आयप्लस ने भारतात स्मार्ट ग्लासेस आय एक्स सादर केल्या आहेत. याच्या मदतीने सेल्फी क्लिक करता येतील तसेच कॉलिंग सुविधा सुद्धा मिळणार आहे. थोडक्यात या स्मार्ट ग्लास फोन वरून करता येणारी सर्व कामे करण्यास सक्षम आहेत. मिडनाईट ब्लॅक कलर मध्ये त्या उपलब्ध केल्या गेल्या आहेत. टायटन आयच्या सर्व स्टोर्स किंवा अधिकृत वेबसाईटवरून त्यांची खरेदी करता येईल. या ग्लासेसची किंमत आहे ९९९९ रुपये.
टायटन आय एक्स स्मार्ट ग्लास वायरलेस ओपन ईअर स्पीकर व सीव्हीसी (क्लीअर व्हॉइस कल्चर) सह आहेत. ब्ल्यू टूथ व्हर्जन ५.० डायनेमिक व्हॉल्यूम कंट्रोल दिला गेला असून ओपन एअर वायरलेस ऑडीओ मुळे कान ब्लॉक किंवा कव्हर होत नाहीत. व्हॉइस कॉल सपोर्ट मध्ये कॉल रिसीव्ह किंवा रिजेक्ट करता येणार आहे, तसेच म्युझिक ऐकता येणार आहे. सेल्फी क्लिक साठी डावी उजवीकडे टच कंट्रोल आहे. लाईट वेट आणि अन्य स्मार्ट फीचर्सचा सपोर्ट असलेल्या या ग्लाससाठी क्वालकॉम चिपसेट वापरली गेली आहे. फिटनेस ट्रॅकर दिला गेला आहे. त्यांना सनग्लास, कॉम्पुटर ग्लास आणि स्पेक्टीकल ग्लास मोड आहे.