सोमय्यांचा आरोप; यामुळे दिलेल्या जात आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या, लॉकडाउनच्या धमक्या


मुंबई – दिवसोंदिवस मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत असतानाच निर्बंध आणि लॉकडाउनच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारी स्तरावरही बैठकींची सत्र सुरु झाली आहेत. पण असे असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती सर्वसामान्यांमध्ये दाखवली जात असल्याचे सांगत भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

स्वतःच राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने काही सत्ताधारी नेते कोरोनाची तिसरी लाट अशी भीती जनतेमध्ये पसरवत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. स्वत:चे राजकीय वजन वाढवण्यासाठी, आर्थिक कमाईसाठी काही सत्ताधारी नेते कोरोनाची तिसरी लाट, प्रचंड वाढ, लॉकडाऊन अशा धमक्या देऊन लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. ते त्यांनी थांबवावे, असं सोमय्या म्हणाले. ओमिक्रॉनच्या ९५ टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची खरी गरजच पडत नाही. दोन, तीन दिवसांमध्ये लोक बरी होत आहेत. खूप कमी लोक ज्यांना सहव्याधींचा त्रास आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यायची गरज असल्याचेही सोमय्या म्हणाले.