‘टिप-टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स करणारा पाकिस्तानी मंत्री झाला ट्रोल ?


सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आणि छोट्या पडद्यावरील सुत्रसंचालक आमिर लियाकत हुसैन चर्चेत आहे. हा एक डान्स व्हिडीओ असून यात डान्स करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून आमिर लियाकत असल्याचे म्हटले जात आहे. आमिर या व्हिडीओत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर आमिर लियाकत हुसैन यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी टिप-टिप बरसा पानी या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. आमिर व्हिडीओच्या सुरुवातीला दोन मुलींसोबत एण्ट्री करताना दिसत आहे. त्यानंतर आमिर यांनी डान्स करायला सुरुवात केल्यानंतर त्या दोघी निघून जातात.


अनेक नेटकऱ्यांनी हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर आमिर यांनाच ट्रोल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला त्याला ट्रोल केले आहे. दरम्यान, या व्हिडीओत डान्स करणारी व्यक्ती ही आमिर लियाकत हुसैन नाही, तर शोएब शकूर आहे. शोएब शकूर हा एक प्रोफेशनल डान्सर आहे. त्याने हा व्हिडीओ स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. एवढेच काय, तर शोएब शकुरचा हा व्हिडीओ फेसबूकवर पण प्रचंड व्हायरल झाला आहे.