अभिनेत्री स्वरा भास्करला कोरोनाची लागण


कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकडेवारीने संपूर्ण देशाची पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात देशात १ लाख १७ हजार १०० नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्करने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपण कोरोनाबाधित असल्याचे सांगितले आहे.


आपल्या कोरोना झाल्याची माहिती स्वरा भास्करने ट्विट करत दिली आहे. आताच माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला आणि माझी चाचणी पॉझिटिव्ह आली. मी स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले असून मला ताप आला आहे, तोंडाची चव गेली आहे आणि प्रचंड डोके दुखत आहे. माझे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत त्यामुळे मी लवकर बरी होईन अशी आशा करते. घरात रहा सुरक्षित रहा, या आशयाचे ट्विट स्वरा भास्करने केले आहे.