भारतात लाँच झाला शाओमी ११ आय हायपरचार्ज

शाओमीने ११ सिरीज मधील स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. त्यात ११ हायपरचार्ज फाईव्ह जी लाँच केला गेला आहे. फास्ट चार्जिंग, शानदार कॅमेरा सेटअप आणि दमदार प्रोसेसर सह हा फोन आला आहे. त्याला १ टीबी पर्यंत एसडी कार्ड सुविधा दिली गेली आहे. एमआययुआय १२.५ वर हा फोन काम करेल. भारतातील हा सर्वाधिक वेगाने चार्ज होणारा स्मार्टफोन असून त्याला १२० डब्ल्यू फास्ट सपोर्ट दिला गेला आहे. त्यामुळे हा फोन १५ मिनिटात १०० टक्के चार्ज होतो. फोनला ५१६० एमएएच बॅटरी दिली गेली आहे.

या फोनच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा १०८ एमपीचा असून ८ एमपीचे आणखी दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी १६ एमपीचा कॅमेरा आहे. लो लाईट मध्येही शानदार फोटो काढता येतात असा कंपनीचा दावा आहे. फोन साठी फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

या फोनला ६.६७ इंची फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला गेला असून फोनचे रेटिंग आयपी ५३ आहे. म्हणजे फोन धूळ आणि पाणी प्रतिबंधक आहे. दोन स्टोरेज व्हेरीयंट मध्ये हा फोन सादर झाला आहे. ६ जीबी रॅ, १२८ जीबी स्टोरेजची किंमत २६९९९ तर ८ जीबी रॅ,, १२८ जीबी स्टोरेजची किंमत २८९९९ रुपये आहे. ब्ल्यू, ब्लॅक, ग्रीन आणि पर्पल कलर ऑप्शन मध्ये फोन उपलब्ध आहे.