करोनाचे नवे व्हेरीयंट ओमेगा देणार नवे आव्हान

करोनाची आत्तापर्यंत अनेक व्हेरीयंट आली आहेत आणि नित्यनवीन येतच राहणार असे वैज्ञानिक सांगत असतानाच टाईम ट्रॅव्हलरच्या भविष्यवाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाला आहे. त्यानुसार कोविडचा नवा स्ट्रेन ओमेगा मानव जातीपुढे मोठे आव्हान उभे करू शकतो. डेल्टा पेक्षा सुद्धा हा स्ट्रेन अधिक धोकादायक असेल कारण त्यामुळे माणूस आणि चिपांझी यांची लक्षणे असलेली मुले जन्माला येऊ शकतील. या नव्या स्ट्रेनचे दुष्परिणाम इतके भयानक असतील कि त्यामुळे निसर्गालाच आव्हान दिले जाईल.

टाईम ट्रॅव्हलरचा असा दावा आहे की तो भविष्य पाहू शकतो. २०२२ मध्येच कोविडचे हे नवे व्हेरीयंट येईल असा त्याचा दावा आहे. पूर्वी माणूस वानरच होता आणि त्यात परिवर्तन होत गेले आणि त्यातून आजचा प्रगत माणूस बनला असे विज्ञान सांगते. कोविडच्या आगामी नव्या स्ट्रेनमूळे मानव जातीची वाटचाल पुन्हा वानर युगाकडे सुरु होऊ शकते असा इशारा टाइम ट्रॅव्हलर देतो. त्याच्या दाव्यानुसार प्राणी आणि माणूस यातील अंतर नष्ट होईल. ज्याला या भविष्याबद्दल शंका आहेत त्यांनी काही तारखा नोंद करून ठेवा असेही त्याचे म्हणणे आहे.

या दाव्यानुसार ११ मार्च पूर्वी चिपांझी सारखे मुल जन्माला येईल पण ते बोलू शकेल. १९ एप्रिल रोजी नवा स्ट्रेन ओमेगा येईल आणि तो पाच पट अधिक खतरनाक असेल. १७ सप्टेंबर रोजी समुद्रात ब्लू व्हेल पेक्षा चारपट मोठा जीव दिसेल. टाइम ट्रॅव्हलरच्या व्हिडीओ ला आत्ता पर्यंत १ कोटी व्ह्यू मिळाले आहेत.