रश्मी ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी भाजपच्या सोशल मीडिया प्रभारीला पोलिसांची नोटीस


मुंबई : भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांना पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह टिपणी केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. जितेन गजरिया यांना जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांच्या सायबर सेलने बोलावले आहे. रश्मी ठाकरेंबाबत जितेंन गजरिया यांनी आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गजरिया यांना नोटीस पाठवली आहे.

रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे आक्षेपार्ह लिखाण भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजरिया यांनी केले आहे. आता या ट्विटवरुन सायबर पोलिसांनी जितेन गजरिया यांना नोटीस पाठवली असून त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.

जितेन गजारिया यांनी या ट्विटसोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्विट केले आहे. आता या ट्विटमागे आणि त्यामधील मजकूरामागे काय हेतू होता ही माहिती घेण्यासाठी सायबर पोलिसांनी जितेन गजारिया यांना नोटीस पाठवली असून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

जितेन गजारिया यांनी केलेली पोस्ट ही अत्यंत आक्षेपार्ह असून त्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जितेन गजारिया हे या प्रकरणात जर दोषी आढळले तर त्यांना अटक होऊ शकते.