परळी न्यायालयाचे राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट


परळी – परळी न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने हा निर्णय 2008 सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे घेतला आहे. पण याप्रकरणी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. ते सातत्याने या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांना मुंबई येथे 22 ऑक्टोबर 2008 रोजी अटक झाली होती, संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले होते. राज ठाकरे यांच्या अटकेचा निषेध परळीत देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यादरम्यान, सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेवर कार्यकर्त्यांनी धर्मापुरी पॉइंट येथे दगडफेक केली. दगडफेकीत बसच समोरील काच फुटून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते.

ऑक्‍टोबर 2008 ला मुंबईमध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आले होते, राज्यभर या घटनेचा परिणाम उमटला होता. या अटकेच्या विरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड झाली होती. बसेसवर दगडफेक झाली होती, असाच प्रकार परळी मध्ये सुद्धा घडला होता. धर्मापुरी पॉईंट येथेसुद्धा एसटी बसेसवर दगडफेक झाली होती, ज्यामध्ये एसटीचे नुकसान झाले होते. जमावबंदी आदेश मोडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व चिथावणीखोर वक्तव्य करण्यात या कारणावरून या घटनेनंतर मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते परळी पोलीस ठाणे सुद्धा या प्रकरणांमध्ये तपास पूर्ण करून या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.