अमृता फडणवीस यांनी केलेले नवे ट्विट चर्चेत


सोशल मीडियावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बऱ्याच सक्रिय असतात. सोशल मीडियावरील नेटिझन्समध्ये त्यांची गाणी आणि त्यांचे ट्विट्स हे प्रचंड व्हायरल होतात. म्हणूनच सोशल मीडियावर त्यांची नेहमीच चर्चा असते. आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा केलेले एक नवीन ट्विट चर्चेत आले आहे. अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये स्वत:चा एक फोटो शेअर केला असून त्यावर एक क्रिएटिव्ह कॅप्शन देखील दिली आहे. या कॅप्शनमधील मजकुरामुळे हे ट्विट चर्चेत आले असून त्यावर अनेक नेटिझन्स वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देखील देत आहेत.


आपल्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या एक योगासन करताना दिसत आहेत. हिरवळीवर योगासन करतानाचा त्याचा हा फोटो व्हायरल होऊ लागला आहे. त्यांनी यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलेली ओळ देखील चर्चेत आहे. जगाची चुकीची बाजू वर आहे. ते उलट्याबाजूने फिरवण्याची गरज आहे. असे केल्यास जगाची योग्य बाजू वर येईल, अशा आशयाचे ट्विट त्यांनी इंग्रजी भाषेतून केले आहे. आता काही नेटिझन्सनी अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर त्यांचे योगासन करतानाचे फोटो किंवा व्हिडीओ ट्विट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.