विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा


नवी दिल्ली – न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. गुरुवारी 15 सदस्यीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली. संघाचे कर्णधारपद मिताली राजकडे सोपवण्यात आले आहे. तर, उपकर्णधाराची जबाबादारी हरमनप्रीत कौरकडे देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज शिखा पांडेला संघात स्थान मिळालेले नाही. विश्वचषकातील पहिला सामना भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 6 मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा येथे होणार आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात शिखा पांडेने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तिने ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला क्लीन बोल्ड केले होते. सोशल मीडियावर या चेंडूची खूप चर्चा रंगली होती. भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने तर या चेंडूला महिला क्रिकेटमधील बॉल ऑफ द सेन्चुरी असे म्हटले होते.

भारतीय महिला क्रिकेट संघाचे सामने

  1. भारत विरुद्द पाकिस्तान – 6 मार्च 2022
  2. भारत विरुद्ध न्यूझीलंड- 10 मार्च 2022
  3. भारत विरुद्ध वेस्ट इंडीज- 12 मार्च 2022
  4. भारत विरुद्ध इंग्लंड- 16 मार्च 2022
  5. भारत विरुद्ध ऑकलँड- 19 मार्च 2022
  6. भारत विरुद्ध बांगलादेश- 22 मार्च 2022
  7. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- 27 मार्च 2022

भारतीय संघ- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघा सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया (विकेटकीपर), राजेश्वर गायकवाड, पूनम यादव.