झुलन गोस्वामींच्या बायोपिकचा टीझर पाहताच नेटकरी म्हणाले…


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी अभिनेत्री अनुष्का शर्मा ही एक आहे. त्याचबरोबर अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण, गेल्या काही काळापासून अनुष्काने काही पोस्ट केले की आता तिचे चाहते आपल्याला तिच्या आगामी चित्रपटाविषयी माहिती मिळेल असे नेहमी म्हणतात. आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या आगामी चित्रपटाविषयी अनुष्काने घोषणा केली आहे. पण, यावेळी तिला ट्रोल केले आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अनुष्काने छकडा एक्सप्रेस या तिच्या आगामी चित्रपटाचा टिझर शेअर केला. हा चित्रपट माजी भारतीय महिला टीमच्या कर्णधार झुलन गोस्वामीवर आधारित आहे. या टीझरमध्ये अनुष्काच्या हातात बॅट असून ती मैदानात आहे. हा टीझर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे, तर काही नेटकऱ्यांना हा आवडलाच नाही. अनुष्काचा ना रंग, ना तिची उंची आणि ना ही तिची बंगाली भाषा ही झुलन गोस्वामींसारखी असल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.