राज्यातील 305 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण


मुंबई – राज्यातील कोरोनाबाधितांसोबत ओमिक्रॉनबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच आता राज्यातील 305 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोळुंखे यांनी दिली. मागील तीन दिवसांत जे. जे. रुग्णालयासह राज्यातील विविध रूग्णालयांतील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती डॉ. सोळुंखे यांनी दिली.

तर काल दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे 26.538 रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत वाढ होत आहे. राज्यातील जे. जे. रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम, ठाणे, धुळे, कुपर, पुण्यातील ससून रुग्णालय, मिरज, लातूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनासह ओमिक्रॉनबाधितांमध्ये वाढ होत आहे. राज्यात सध्या 653 जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्यातील 259 जण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.