खासदारांसोबत काम करण्याची संधी, ९ जानेवारी पूर्वी करा अर्ज

पीआरएस लेजीस्लेटिव्ह रिसर्चने पुन्हा एकदा देशातील युवा वर्गाला देशाच्या संसदेत खासदारांसोबत काम करण्याची संधी उपलब्ध केली आहे. लेजीस्लेटिव्ह असिस्टंट टू मेंबर ऑफ पार्लमेंट (लँप) फेलोशिप साठी अर्ज करण्याची मुदत ९ जानेवारी रोजी संपत आहे. या विशेष वर्गाचे हे १२ वे संस्करण आहे.

कायदेनिर्मिती, धोरणे, राजकारण या क्षेत्रात योग्य तरुण यावेत यासाठी ही योजना राबविली जात आहे. यात युवकांना खासदारांसोबत काम करण्याची संधी दिली जाते. संसदेत कायदा, विविध धोरणे या संदर्भात चर्चा होत असताना त्यात सहभागी होण्याची, वादविवादाची संधी मिळते. खासदारांना आवश्यक माहिती शोधून देणे याचा अनुभव घेता येतो. १० महिन्याच्या या प्रशिक्षण काळात कायदा निर्मितीच्या सर्व बाजू, संसदेचे कामकाज कसे चालते याचे जवळून निरीक्षण करता येते. निवडलेल्या तरुणांना खासदारांची मेंटोरशिप मिळते.

याशिवाय विविध प्रकारची धोरणे ठरविताना काय काय केले जाते याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन मिळते. या कामासाठी दर महा २० हजार रुपये विद्यावेतन दिले जाते आणि प्रशिक्षण संपल्यावर राजनीती, लोकसेवा, थिंक टँक, व पब्लिक पॉलीसी क्षेत्रात कामाची संधी मिळते. जगातील प्रख्यात विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी संधी मिळते. या साठी कोणत्याही विषयातील पदवीधर अर्ज करू शकतात. २५ किंवा त्या पेक्षा कमी वयाचे उमेदवार त्यासाठी पात्र आहेत. उमेदवार भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.