पत्त्यातील राजांच्या गम्मत गोष्टी

सुटी लागली कि पत्ते खेळणे हा अनेकांचा आवडता टाईमपास असतो. बरेच लोक रोज पत्ते खेळतात. पैसे लावून पत्ते खेळणारे सुद्धा खूप आहेत. पत्त्याचा डाव एकसारखा असला तरी विविध प्रकारे पत्ते खेळले जातात. ५२ पत्ते आणि जोकर असलेला हा डाव. त्यातील चित्रे सुद्धा सारखीच असतात पण फार कमी लोकांच्या लक्षात आले असेल कि पट्ट्यातील बदाम राजाला मिशा नाहीत. असे का बरे यामागचे कारण फार मजेदार आहे.

असे सांगतात कि जेव्हा प्रथम पत्ते कॅट बनविला गेला तेव्हा सर्व राजांना मिशा होत्या. अगदी बदाम राजाला सुद्धा. पण जेव्हा पत्ते पुन्हा एकदा नव्याने डिझाईन केले गेले तेव्हा डिझायनर बदाम राजाला मिशी काढायला विसरला. ही चूक पुढे कधीच सुधारली गेली नाही. पत्यातील चार राजे इतिहासातील महान राजांवरून प्रेरणा घेऊन रेखले गेले आहेत.

सर्वात महत्वाचा इस्पिक राजा इस्रायलच्या प्राचीन युगातील डेव्हिड नावाचा राजा मानला जातो तर किलवर जग जिंकणाऱ्या मेस्डोनियाचा राजा सिकंदर याचे प्रतिक मानतात. बदाम फ्रांस राजा शार्लेमेन राजाच्या चित्रावरून रेखला गेल्याचे सांगतात तर चौकट रोमन राजा ऑगस्टस किंव ज्युलीयस सीझरवरून प्रेरणा घेऊन बनविला असे म्हणतात.

पत्ते नक्की कुठे उगम पावले याविषयी अनेक वाद आहेत. सर्वप्रथम चीन मध्ये पत्ते बनविले गेले असे मानले जाते.१४ व्या शतकात युरोप मध्ये पत्ते प्रचलित होते. १६ व्या शतकात फ्रेंच कार्ड मेकर्सनी पुन्हा नव्याने पत्ते डिझाईन केले त्यावेळी राजांच्या प्रतीकांवरून पत्त्यातील राजे आकारास आले असे सांगतात.