नोवाकचा व्हिसा विमानतळावरच रद्द, फुटले वादाला तोंड

जगातील नंबर वनचा, सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच याचा व्हिसा मेलबर्न विमानतळावर रद्द करण्यात आल्याच्या प्रकाराने नवीन वादाला तोंड फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नोवाक ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियात मेलबर्न विमानतळावर आला पण तेथेच त्याला थांबविले गेले. इतकेच नव्हे तर देशात प्रवेश करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे नाहीत म्हणून त्याचा विसा रद्द केला गेला. ऑस्ट्रेलियातर्फे एक दिवस आधी नोवाक याला करोना लसीकरण नियमातून सूट दिल्याचे जाहीर केले गेले होते आणि ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये खेळण्याची परवानगी दिली गेली होती.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरीसन स्कॉट यांनी कायदा सर्वांसाठी सारखा आहे आणि कायद्याच्या वर कुणी नाही असे म्हटले आहे. नोवाकने कोविड लसीकरण संदर्भात कागदपत्रे दिली नाहीत असे सांगितले जात आहे. नोवाक कडून ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते असे सांगितले जात आहे.

दरम्यान सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वूसिक यांनी त्यांच्या इन्स्टापेज वर जोकोविच बरोबर फोनवरून बोलणे झाल्याची पोस्ट केली असून सर्व सर्बिया तुझ्या सोबत आहे असे म्हटले आहे. ते म्हणतात,’आमचे अधिकारी जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूची मानहानी करण्याचा जे प्रकरण घडले ते लवकरात लवकर संपविण्याचा उपाय योजतील. सर्बिया आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जोकोविचला न्याय मिळवा व त्याच्या सच्चाई साठी लढेल.

ऑस्ट्रेलियन मिडियाने जोकोविच याने चुकीच्या पद्धतीने व्हिसा साठी अर्ज केल्याचा दावा केला आहे. मेडिकल सवलत याचा अर्थ करोना लसीचे स्टेट्स देण्यातून सूट असा नाही असा खुलासा केला गेला आहे. जोकोविचने करोना लसीकरण संदर्भात खुलासा केला नाही असेही सांगितले जात आहे.