संजय राऊत यांच्यासह आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीही कोरोनाबाधित


मुंबई – कोरोनाबाधितांची राज्यातील संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. त्यातच राज्यातील नेत्यांना आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधील १२ मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातील जवळपास ७० आमदार सध्या कोरोनाबाधित आहेत. दरम्यान आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या परिवारातील इतर तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाची लागण संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला झाली आहे. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली. त्यानंतर चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले . या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.