रंग बदलणारा विवो व्ही २३, फाईव्ह जी भारतात लाँच
कलर बदलणारा भारताचा पहिला स्मार्टफोन विवो व्ही २३ सिरीज आज (५ जानेवारी) दुपारी १२ वा. लाँच होत आहे. विविध लाईट कंडीशन मध्ये या फोनचा रंग वेगळा दिसेलच पण ५० एमपीचा ड्युअल सेल्फी कॅमेरा असलेला देशातील हा पहिलाच फोन असेल असा कंपनीचा दावा आहे. या सिरीज मध्ये विवो व्ही २३ आणि व्ही २३ प्रो असे दोन स्मार्टफोन सादर केले जात आहेत. दोन्ही फोन फाईव्ह जी ला सपोर्ट करणार आहेत. फोन मधील कलर चेंजिंग तंत्र फक्त सनशाइन गोल्ड कलर फोन मध्येच अनुभवता येणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे. हे फोन २६ ते २९ हजार किमतीच्या रेंज मध्ये असतील.
या फोनला थ्री डी कर्व्ड स्क्रीन असून फोन अतिशय सडपातळ आहे. फ्रंटला ड्युअल सेल्फी कॅमेरा सुपर वाईड अँगल नाईट कॅमेरासह दिला गेला आहे. फोन साठी ६.४४ इंची फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले असून ४२०० एमएएचची ४४ वॉल्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी आहे. रिअरला ६४ एमपीचा प्रायमरी, ८ एमपीचा अल्ट्रावाईड अँगल आणि २ एमपीचा मॅक्रो सेन्सर असा ट्रिपल कॅमेरा सेट आहे. विवो २३ प्रो मध्ये ६.५६ इंची थ्री डी कर्व्ड डिस्प्ले दिला जात आहे असे समजते.