इंडिया महाराजा टीम मध्ये सेहवाग, हरभजन, युवराज सामील

भारताचे माजी क्रिकेट खेळाडू वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग २० जानेवारी पासून ओमान येथे सुरु होत असलेल्या लिजेंडस लीग क्रिकेट मध्ये खेळणार आहेत. या तिघांचा समावेश इंडिया महाराजा टीम मध्ये झाला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतलेल्या क्रिकेट व्यावसायिकांची ही लीग आहे. यात तीन टीम सहभागी होत आहेत. इंडिया महाराजा बरोबर आशिया व शेष विश्व अश्या अन्य दोन टीम आहेत.

या लीगचे आयुक्त टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री हे आहेत. या लीगचा हा पहिलाच सिझन आहे. इंडिया महाराजा मध्ये वरील तिघांशिवाय इरफान पठाण, युसुफ पठाण, बद्रीनाथ, आर.पी सिंग, प्रज्ञान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी या माजी क्रिकेटपटूंचा समावेश आहे. क्रिकेट मधील बडे स्टार्स या निमित्ताने एकत्र येत आहेत.

आशिया लायन्स टीम मध्ये पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्थानचा माजी कप्तान असगर अफगाण याचा समावेश आहे. पाकिस्तानचे शोएब, शहीद आफ्रिदी,शोएब मलिक, मिस्बाह, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, मुरलीधरन, चामिंडा वास, कामराज यांचा समावेश असल्याचे समजते.