उर्जा क्षेत्रातील दिग्गज ओएनजीसीच्या प्रमुखपदी प्रथमच महिला

देशाच्या उर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी ओएनजीसीच्या अध्यक्षपदी इतिहासात प्रथमच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे नाव आहे डॉ. अलका मित्तल. सोमवारी त्यांच्याकडे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली गेली आहे. सर्वात मूल्यवान पीएसयु ओएनजीसीच्या हेड म्हणून प्रथमच एक महिला नेमली गेली आहे. माजी अध्यक्ष सुभाष कुमार ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाले आहेत.

आणखी एक विशेष म्हणजे सर्वसामान्य पद्धतीप्रमाणे कोणत्याही सरकारी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे प्रमुख निवृत्त होण्यापूर्वी २ महिने अगोदर त्यांच्या उत्तराधिकारीची घोषणा केली जाते. मात्र ओएनजीसी मध्ये यावेळी हे घडले नाही आणि कंपनी दोन दिवस विना अध्यक्ष काम करत होती.

डॉ. अलका मित्तल यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एमबीए व कॉमर्स बिझिनेस मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळविली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांनी ग्रॅज्यूएट ट्रेनी म्हणून १९८५ मध्ये ओएनजीसी मध्ये काम सुरु केले. २०१८ पासून त्या एचआर हेड होत्या. त्यापूर्वी  ओंएनजीसीच्या इतिहासात पूर्ण वेळ हेड म्हणून काम करणारी पहिली महिला म्हणून मित्तल यांच्या नावाची नोंद केली आहे. स्कील डेव्हलपमेंट चीफ म्हणून त्यांनी देशभर अनेक कार्यक्रम राबविले आणि पूर्ण भारतासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत.