बुस्टर डोस साठी भारत बायोटेकचे नेसल वॅक्सिन देण्याचा प्रस्ताव

कोविड १९ ओमिक्रोन मुळे भारतात लसीचा बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. भारत बायोटेकच्या नेसल वॅक्सिनचा वापर बुस्टर डोस म्हणून करावा असा प्रस्ताव कंपनीने केंद्रीय आरोग्य विभागाला दिला असून त्या संदर्भात तज्ञ समितीची आज (४ जानेवारी) महत्वाची बैठक होत असल्याचे समजते. भारत बायोटेकने ज्या नागरिकांनी कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे दोन डोस घेतले आहेत त्यांना बुस्टर डोस म्हणून  नेसल वॅक्सिन दिले जावे असा प्रस्ताव दिला आहे,

या प्रस्तावानुसार बीबीव्ही १५४ नेसल वॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली आहे त्या १५०० व ज्यांनी कोवॅक्सिन घेतली आहे त्या १५०० नागरिकांवर घेतल्या जात असल्याचेही समजते. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने यापूर्वीच कोवॅक्सिन बीबीवी १५२ पूर्ण विषाणू निष्क्रिय कोविड लस, चाचण्यात बाल चिकित्सा करताना सुरक्षित, सहज सहन करता येणारी आणि इम्युनोजेनिक असल्याचे दिसल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या चाचण्या झाल्याची घोषणा केली होती. या संदर्भात एक प्रेस रिलीज कंपनीने काढले असून त्यात भारत बायोटेक २ ते १८ वयोगटातील स्वस्थ मुले व किशोर यांच्यातील कोवॅक्सिन सुरक्षा, प्रतिक्रियात्मकता व इम्युनोजेनेसिटीचे मुल्यांकन केले गेल्याचे म्हटले आहे.