हा आहे ए. आर. रहमानचा होणारा जावई


काही काळापूर्वी हिजाबच्या मुद्द्यावरुन चर्चेत आलेली ए. आर. रहमानची मुलगी खतीजा रहमानचा साखरपुडा (ऐंगेजमेंट) झाला असून खतीजानेच तिच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. खतीजाने या पोस्टमध्ये स्वत:सोबतच तिचा होणारा पती रियासदीनचा फोटो शेअर केला आहे. २९ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम झाला. पण खतीजा आणि रियासदीन या दोघांनाही चार दिवसांनंतर म्हणजेच नवीन वर्षामध्ये हा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे.


हा फोटो शेअर करताना खतीजाने एक सविस्तर कॅप्शन दिली आहे. मला ऑडिओ इंजीनियर असणाऱ्या रियासदीन शेख मोहम्मदसोबत साखरपुडा झाल्याचे सांगताना फार आनंद होत आहे. २९ डिसेंबर रोजी माझा साखरपुडा जवळचे नातेवाईक आणि प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडला.

ए. आर. रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांना खतीजा, रहीमा आणि ए. आर. अमीन अशी एकूण तीन मुले आहेत. काही तमिळ चित्रपटांमध्ये खतीजाने गाणी गायली आहेत. त्यांनी रजनीकांत यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या एंथीरन के पुडिया मनिधा या गाण्यापासून आपला संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु केला. खतीजा आणि रियासदीन यांचे लग्न कधी आणि कुठे होणार आहे, याची माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचे समजते.