‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा आधार कार्डवरील फोटो अपडेट करा


कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ आधार कार्डाशिवाय घेता येत नाही. त्याचबरोबर बँक खाते आणि आयटीआरसारखी महत्त्वाची कामे आधारशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. कारण आधार हे एकमेव ओळख दस्तऐवज आहे ज्यामध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो यासह बायोमेट्रिक तपशील असतात. अशा परिस्थितीत तुम्हाला आधार कार्डमधील फोटो अपडेट करायचा असल्यास यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यानंतर ते एका चुटकीसरशी आधार कार्डमध्ये अपडेट होईल.

बायोमेट्रिक्सद्वारे आधार पडताळण्याची सुविधा ज्या ठिकाणी नाही. तेथे फोटो आणि इतर तपशीलांद्वारे आधारची पडताळणी केली जाते. अशा स्थितीत कधी-कधी आधार कार्डमधील जुन्या फोटोमुळे खूप त्रास होतो. त्यामुळे तुमच्या आधार कार्डमधील फोटो वेळोवेळी अपडेट करत राहणे आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये फोटो अपडेट करणे खूप सोपे आहे. यासाठी आधार नोंदणी केंद्र किंवा आधार सेवा केंद्रात जावे लागेल. जिथे आवश्यक कागदपत्रे आणि शुल्क भरल्यानंतर आधार कार्डमधील फोटो अपडेट केला जाईल.

आधार कार्डमधील फोटो ‘या’ स्टेप्स फॉलो करून अपडेट करा

  • सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • तेथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा फोटो बदलण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल.
  • तुमचा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल.
  • आता हा फॉर्म आधार एनरोलमेंट एक्झिक्युटिव्हकडे जमा करावा लागेल.
  • प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला ठराविक शुल्क भरावे लागेल.
  • आधार नोंदणी केंद्रातील एक विभाग अधिकारी तुमचा एक नवीन फोटो क्लिक करेल आणि ते आधार कार्डमध्ये अपलोड करेल.
  • आधार नोंदणी कार्यकारी तुम्हाला अपडेट विनंती क्रमांक आणि पोचपावती स्लिप देईल.
  • URN सोबत तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार अपडेट स्टेटस ऑनलाइन तपासू शकता आणि अपडेट झाल्यावर प्रिंट आउट घेऊ शकता.