एकता कपूरला कोरोनाची लागण


देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कोरोनाची लागण सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांना झाल्याचे पाहायला मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता जॉन अब्राहम पाठोपाठ आता एकता कपूरला कोरोनाची लागण झाली आहे.


याबाबत तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. सर्व काळजी घेतल्यानंतरही माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्बेत ठिक आहे आणि माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करते की त्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, या आशयची पोस्ट शेअर केली आहे. एकताने स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे.

एकता कपूर पूर्वी करीना कपूर खान, अमृता अरोरा, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर, करण बुलानी, मृणाल ठाकूर, जॉन अब्राहम आणि इतर काही कलाकारांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यानंतर आता एकता कपूरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.